कतारची राजधानी दोहामध्ये हमासच्या नेत्यांवर इस्रायलचा हल्ला

कतारची राजधानी दोहामध्ये हमासच्या नेत्यांवर इस्रायलचा हल्ला

फोटो स्रोत, Reuters

54 मिनिटांपूर्वी

कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये ज्या हमासच्या नेत्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्यावर ‘अचूक हल्ले’ केल्याची माहिती इस्रायलच्या सैन्यानं दिली आहे.

आयडीएफनं दिलेल्या माहितीत हे मात्र सांगण्यात आलेलं नाही की हे हल्ले नेमके कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहेत.

मात्र एएफजी या वृत्तसंस्थेनुसार, दोह्यात स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि आकाशात धुराचे लोट दिसले आहेत

तर हमासच्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीला माहिती दिली आहे की दोह्यामध्ये वाटाघाटींची बैठक सुरू असताना त्यांच्या शिष्टमंडळाला लक्ष्य करण्यात आलं.

इस्रायलच्या सैन्यानं कतारमधील हल्ल्याबाबत वक्तव्यं दिलं आहे की, “आयडीएफ आणि आयएसए यांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांवर टार्गेटेड हल्ले केले आहेत.”

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले

तोंडाला दुर्गंधी का येते आणि ती कशी दूर करावी?

‘मी कधीच सिगरेट ओढली नसताना मला कॅन्सर कसा झाला?’, जाणून घ्या फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल सर्वकाही

नेपाळमध्ये वाढतंय हिंदुत्वाचं राजकारण, काय आहे आरएसएसची भूमिका?

एका फोन आला अन् क्षणात 5.85 कोटी बँक अकाऊंटमधून गेले; महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ करून कसं लुटलं?

End of सर्वाधिक वाचलेले

“अनेक वर्षांपासून हमासच्या या नेत्यांनी या दहशतवादी संघटनेच्या कारवायांचं नेतृत्व केलं आहे. इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरला झालेल्या क्रूर हत्याकांडासाठी हेच नेते थेट जबाबदार आहेत. त्यांनीच इस्रायलविरोधातील युद्धाची आखणी आणि व्यवस्थापन केलं आहे.”

“या हल्ल्यांआधी, दोह्यातील नागरिकांचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यात अचूनकतेनं मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांचा वापर आणि अतिरिक्त गुप्तचर माहितीचा समावेश आहे.”

‘आंतरराष्ट्रीय कायद्याची पायमल्ली’

“7 ऑक्टोबरच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेचा पराभव करण्यासाठी आयडीएफ आणि आयएसए दृढनिश्चयानं काम करत राहतील.”

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई एका सरकारी वृत्तवाहिनीवर बोलताना म्हणाले की हे “आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन” आहे. तसंच “वाटाघाटी करणाऱ्या कतार आणि पॅलेस्टिनच्या प्रतिनिधींच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं उल्लंघन” आहे.

हा हल्ला “या प्रदेशासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी गंभीर इशारा आहे”, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं पुढे म्हटलं.

जूनच्या अखेरीपासून इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे.

‘इस्रायलचा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उघड उल्लंघन’ – कतार

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं “इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध” केला आहे.

डॉ. माजेद अल अन्सारी म्हणाले की “कतारची राजधानी असलेल्या दोह्यात हमासच्या राजकीय ब्युरोचे अनेक सदस्य राहत असलेल्या निवासी परिसरात” हा हल्ला झाला.

ते म्हणाले की हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं ‘उघड उल्लंघन’ आहे, तसंच कतारसाठी ‘गंभीर धोका’ आहे.

कतारकडून देण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, “कतार सरकार या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतं आणि इस्रायलच्या या बेपर्वा वर्तनाला आणि या प्रदेशातील सुरक्षेशी सातत्यानं छेडछाड करण्याला, तसंच कतारच्या सुरक्षिततेला आणि सार्वभौमत्वाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या कोणत्याही कारवाईला सहन करणार नाही.”

हा हल्ला म्हणजे इस्रायलची स्वतंत्र कारवाई – नेतन्याहूचं कार्यालय

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, “हमास या दहशतवादी संघटनेच्या सर्वोच्च नेत्यांविरोधात करण्यात आलेली आजची कारवाई ही पूर्णपणे इस्रायलची स्वतंत्र कारवाई होती.”

फोटो स्रोत, Reuters

“इस्रायलनं या कारवाईची सुरुवात केली, ती अंमलात आणली आणि इस्रायल या हल्ल्याची पूर्ण जबाबदारी घेतं,” असं या वक्तव्यात म्हटलं आहे.

इस्रायलचे अति-उजवे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच म्हणाले की इस्रायलनं आज दोह्यामध्ये केलेल्या हल्ल्यातून दिसतं की “दहशतवादी जगात कुठेही सुरक्षित राहू शकत नाहीत आणि नसतील.”

हा हल्ला म्हणजे ‘योग्य निर्णय’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की इस्रायलच्या सैन्यानं आणि त्यांच्या गुप्तचर विभागांनी या हल्ल्याची ‘अचूक अंमलबजावणी’ केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

 

Author

Leave a Comment