घरी आलेल्या पाहुण्यांना सलमान खान सर्वात आधी काय विचारतो? काजोलने भाईजानबद्दल सगळंच सांगितलं | मनोरंजन – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
Last Updated:September 26, 2025 10:27 PM IST
Salman Khan : घरी आलेल्या पाहुण्याला सलमान खान सर्वात आधी काय विचारतो? या प्रश्नावर काजोलने सलमानची सवय सांगितली आहे.
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या अंदाजामुळे आणि जबरदस्त ह्यूमरमुळे ओळखला जाणारा सलमान खान सध्या चर्चेत आहे. नुकताच तो अभिनेता आमिर खानसोबत अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच’ या नवीन शोमध्ये दिसला.
advertisement
Amazon Prime वर नुकताच या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला असून, यात सलमान-आमिरने त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक मजेदार गोष्टी शेअर केल्या आहेत.
advertisement
काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या या खास शोमध्ये दोन्ही खान बंधूंनी एकत्र हजेरी लावली. शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या सलमान आणि आमिरला काजोल आणि ट्विंकलने खूप चविष्ट जेवण ऑफर केला. टेबलवर दाबेलीपासून वडापावपर्यंत सगळे पदार्थ ठेवले होते.
advertisement
यावेळी काजोलने सलमान खानच्या एका खास सवयीबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “सलमान खानची एक खूप चांगली सवय आहे. तो त्याच्या घरी आलेल्या पाहुण्याला सर्वात आधी एकच प्रश्न विचारतो: ‘आपण काय खाणार?’”
advertisement
या शोमध्ये सलमान आणि आमिरने खूप मजा केली. दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या करिअरमधील चढ-उतारांवर मोकळेपणाने गप्पा मारल्या.
advertisement
सलमान खानने त्याच्या पास्ट रिलेशनशिप्सबद्दलही चर्चा केली. तो म्हणाला की, त्याचे जेवढे ब्रेकअप्स झाले, त्याबद्दल जर कुणाला दोषी धरायचं असेल, तर तो स्वतःलाच दोषी मानतो.
advertisement
तर आमिर खाननेही त्याची पहिली पत्नी रीना आणि दुसरी पत्नी किरणसोबतच्या घटस्फोटाबद्दल आणि सध्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलला.
advertisement
‘मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..’, 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
View All
घरी आलेल्या पाहुण्याला सलमान खान सर्वात आधी काय विचारतो? काजोलचा मोठा खुलासा!
कॅन्सरमुळे पत्नी गेली, मग 18 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडल अभिनेता
महाराष्ट्रासाठी 24 तास कठीण, 9 जिल्ह्यांना अलर्ट, राज्य सरकारनेच दिला इशारा
पतीच्या दुसऱ्या लग्नाची शॉपिंग करत होती, इथे मुलाने बापासाठी रडत रडत लिहिलं पत्र
बुलेट आता विसरा! ना व्हायब्रेशन, ना मेंटेन्स; Honda ची 350cc ची दणकट बाईक लाँच,
आणखी पाहा
जिथे केला माज, तिथेच काढली लाज, घायवळ गँगमधल्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली
मैदानात AK-47 दाखवणाऱ्या फरहानने गुडघे टेकले, ICCच्या सुनावणीची Inside Story
कॅन्सरमुळे पत्नी गेली, मग 18 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडल अभिनेता
बियर बारच्या बाहेर राडा, तरूणाला पाईपने मारहाण, पाठ झाली निळी-पिवळी
आणखी पाहा
advertisement