चिखलीत ‘बॅनर वॉर’ रंगलं, काँग्रेसचा राडा; माजी आमदारासह 14 जणांवर गुन्हा दाखल

बुलढाणा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात सध्या ‘बॅनर वॉर’ रंगला आहे. ‘मी धावतो व्होटचोरी रोखण्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनर झळकावण्यात आले होते. मात्र या बॅनरना विरोधकांनी प्रत्युत्तर देत विशिष्ट शैलीत प्रत्युत्तरात्मक बॅनर लावले. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

advertisement

शनिवारी सकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी संताप व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर प्रकरण केवळ बॅनरबाजीत मर्यादित न राहता थेट पोलिसांत गेले. दोन्ही गटांमध्ये वाद तीव्र होत असतानाच काँग्रेसचे माजी आमदार  आणि जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

काँग्रेस कार्यकर्ते संतापले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकांत काँग्रेसच्या वतीने लावलेले मॅरेथॉन स्पर्धेचे बॅनर लावण्यात आले होते. त्याला विरोधकांनी देखील बॅनर लावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सकाळी हे बॅनर पाहताच संताप व्यक्त करून बॅनर फाडले, त्यानंतर विरोधकांनी पोलिसांत धाव घेतली. तक्रारीनंतर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घडामोडीनंतर काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून विरोधकांनी मुद्दामून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

advertisement

काँग्रेस आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता
या संपूर्ण प्रकरणामुळे चिखलीत मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे. बॅनर वॉरमुळे निर्माण झालेल्या तणावानंतर पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आहे. चिखलीतील या बॅनर वादामुळे आगामी काळात काँग्रेस आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

advertisement

 पालकांनो काळजी घ्या! खेळता खेळता चुलीत फटाका ठेवला अन्…पुण्यातील 6 वर्षीय चिमुकल्यासोबत भयंकर घडलं
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चिखलीत ‘बॅनर वॉर’ रंगलं, काँग्रेसचा राडा; माजी आमदारासह 14 जणांवर गुन्हा दाखल

 

Author

Leave a Comment