छगन भुजबळांनी अचानक निर्णय बदलला, कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी अचानक निर्णय बदलला, कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार | Chhagan Bhujbal changes his decision will attend cabinet meeting also meet CM Devendra Fadnavis Maratha Reservation GR Maharashtra Politics Marathi News

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठबातम्याराजकारणChhagan Bhujbal : छगन भुजबळांनी अचानक निर्णय बदलला, कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सलग दुसऱ्या मंत्रिमंडळात बैठकीला अनुपस्थित राहणार, असे बोलले जात होते.

By :
निलेश बुधावले, एबीपी माझा | Updated
at : 09 Sep 2025 11:49 AM (IST)

Chhagan Bhujbal
Source : ABP Majha

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन आदेश (GR) जारी केला आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. यामुळे ओबीसी संघटना मात्र सरकारवर नाराज होताना दिसत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसींचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या जीआरला विरोध दर्शवला आहे. दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका देखील दाखल करणार आहेत. तर आज  (9 सप्टेंबर)  राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्वाची बैठक होणार आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीवर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातील छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांनी आपला निर्णय अचानक बदलला आहे.    
छगन भुजबळ सलग दुसऱ्या मंत्रिमंडळात बैठकीला अनुपस्थित राहणार अशी माहिती सुरुवातील समोर आली होती. उपसमितीच्या शिफारसीनुसार काढण्यात आलेला शासन निर्णयाचा निषेध करण्याची छगन भुजबळ अनुपस्थित राहणार असे बोलले जात होते. राष्ट्रवादी पक्षाच्या प्री कॅबीनेट बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार पण मुख्य बैठकीला मात्र अनुपस्थित राहणार असे बोलले जात होते. 
छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार
आता  मंत्री छगन भुजबळांनी अचानक आपला निर्णय बदलला आहे. छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  मंत्रिमंडळ बैठकीनंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शासन निर्णय संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
काय म्हणाले छगन भुजबळ? 
दरम्यान, आज छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. आज प्री कॅबिनेट बैठकीला चाललो आहे. उद्या उपसमितीची बैठक आहे. मराठा समाजात देखील मतभिन्नता आहे. कोण म्हणत जीआरचा फायदा होणार आहे, तर कोण म्हणत फायदा होणार नाही. यात राजकारण आणू नका. हा सामाजिक विषय आहे. माझ्याकडे ओबीसी नेत्यांची मीटिंग झाली. त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की, कोणीही वाद घालायचा नाही. सध्या ओबीसी नेत्यांमध्ये आक्रोश आहे. तो दाखवणं गरजेचं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 
OBC Reservation: आरक्षणावरुन ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली, तायवाडे म्हणाले, “भुजबळ-वडेट्टीवारांनी समाजाची दिशाभूल करु नये”

Published at : 09 Sep 2025 11:49 AM (IST)

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

हॅलो गेस्ट

टॉप आर्टिकल
टॉप रील्स

राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला

राजकारण

संजय राऊतांवर नाराज असल्याने ठाकरेंचे आमदार शिंदे गटात जाणार, शिवसेना नेत्याच्या दाव्यावर खुद्द राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले…

पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, पळण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या

राजकारण

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा

फ्रान्सचे पंतप्रधान फ्रांस्वा बायरु यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव नामंजूर, सरकार पडलं, मोठी नामुष्की

राजकारण

अनेकांना वाटलं माझी राख होईल पण प्रत्येकवेळी मी भरारी घेतलेय: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

Maharashtra LIVE: छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला आजही गैहजर राहण्याची शक्यता; सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत

 

Author

Leave a Comment