ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार

Satej Patil on Cognress : ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार | Satej Patil on Cognress says All those who wanted to go have gone now those who are left will fight for Congress till they are alive

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठबातम्यामहाराष्ट्रSatej Patil on Cognress : ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार

विश्वजीत कदम यांना राज्याचा नकाशावर आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर 100 टक्के सत्ता आणा. आतापासून कामाला लागा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

By :
कुलदीप माने, एबीपी माझा | Edited By: परशराम पाटील | Updated
at : 05 Sep 2025 03:19 PM (IST)

Satej Patil on Cognress
Source : Facebook

Satej Patil on Cognress:  ज्यांना जायचं होते ते सगळे आता गेले आहेत. आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील, असा निर्धार काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘लोकतीर्थ’ या वर्षपूर्ती समारंभात सतेज पाटील यांनी बोलताना सांगलीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 100 टक्के सत्ता आणण्याचे आवाहन केले.
विश्वजीत  कदमांना राज्याचा  नकाशावर  आणायचे  असेल तर..
सतेज पाटील म्हणाले की, विश्वजीत कदम यांना राज्याचा नकाशावर आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर 100 टक्के सत्ता आणा. आतापासून कामाला लागा. सत्ता असो की नसो पलूस कडेगावमध्ये कदम ब्रँड लोकांच्या उपयोगी पडत आहे. सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेची सत्ता आली पाहिजे. सांगली जिल्हा परिषदवर काँग्रेसची सत्ता आहे असे ते ताठ मानाने सांगितले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
विशाल पाटील देखील दिल्लीत गेले
पाटील यांनी सांगितले की, दुष्काळी दौऱ्यात असताना जयकुमार गोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांच्याकडे चारा छावणीची मागणी केली. चार तासात पतंगराव कदम यांनी चारा छावणीचा जीआर काढण्यासाठी सांगितले होते. आजचा नेता दुपारी कुठे आणि आणि संध्याकाळी कुठे आहे हे माहित नाही ही आजची राजकीय परिस्थिती आहे. पतंगराव कदम यांच्यानंतर पलूस कडेगावमध्ये काय? असा प्रश्न होता. आता विश्वजीत कदम तुमच्या सोबत आहेत. दोनवेळा निवडून दिलेच आहेच, त्यांच्या भूमिकेमुळे विशाल पाटील देखील दिल्लीत गेले. जागावाटपावरून आमची चर्चा सुरु होती. महाविकास आघाडी होती, पण विश्वजीत कदम यांना म्हणालो तुम्ही व्हा पुढे आम्ही आहोत सोबत. निवडून आल्यावर सगळे विसरतात, असेही सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीवर ,सतेज पाटील यांनी भाष्य केलं.
जयश्री  पाटील  यांच्यावर  नाव  न  घेता  टीका
दरम्यान, खासदार विशाल पाटील म्हणाले की, पतंगराव कदम हे आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. आमच्या भावकीला लोकतीर्थवर आणून बसवले असते तर ते पक्ष सोडून गेले नसते, असे सांगत विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी व्होट चोरीचा मुद्दा काढला ते लोकांना पटले. राहुल गांधी यांनी या पूर्वीच जीएसटी दोनच स्लॅब असावेत असे सांगितले होते. आता भाजप सरकारने जीएसटीचे दोन स्लॅब केले. देशाला काँग्रेसच्या विचारानेच चालावे लागेल, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या 

Published at : 05 Sep 2025 03:19 PM (IST)

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

हॅलो गेस्ट

टॉप आर्टिकल
टॉप रील्स

महाराष्ट्र

ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार

महाराष्ट्र

तर या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये; आमदार विश्वजीत कदमांचा गर्भित इशारा

महाराष्ट्र

यावरून ओळखायचं मराठे जिंकले आहेत, छगन भुजबळांच्या विरोधावर मनोज जरांगे काय म्हणाले? संजय राऊतांच्या फडणवीस कौतुकावरही बोलले

राजकारण

मी अन् देवेंद्रजी सत्तेचं ताम्रपट घेऊन आलो नाही, 10 वर्षांनी दुसरं कोणी येईल; भुजबळांनी सांगितले संभाव्य धोके

सोलापूर

नेमका मुरूम कशासाठी उपसला, कुर्ड गावातून रिॲलिटी चेक; गुन्हा दाखल, ग्रामस्थांनी सांगितली इनसाईड स्टोरी

क्राईम

आधी व्याह्यानेच व्याह्याला संपवलं, नंतर बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला, पण ‘त्या’ चुकीनं झाला भांडाफोड; नाशिकमधील घटना

राजकारण

अटक करा, जेलमध्ये टाका, पण बारामतीत जाणारच; लक्ष्मण हाके आक्रमक, ओबीसी मोर्चावर ठाम

14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 400 किलो RDX आणि 1 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा; मुंबईला 26/11 हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

 

Author

Leave a Comment