दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे! | dubai Sexual extremities trafficking porta potty scandal
एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठबातम्याविश्वदुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
दुबईतील सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेट उघड; महिलांना खोट्या आश्वासनांनी गुलामीत ढकलले जाते, विकेंडसाठी $5,000–$50,000 पर्यंत पैसे दिले जात आहेत.
By :
जयदीप मेढे | Updated
at : 27 Sep 2025 11:44 AM (IST)
UAE human trafficking scandal | Dubai sex trafficking ring
Source : Facbook
Dubai Dark Secret: दुबईच्या (sex trafficking ring) चमचमीत आभाळाखाली तरुण आणि महिलांच्या यातनांचा काळोख दडत चालला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आलिशान गाड्या, गगनचुंबी इमारती आणि लक्झरी पार्टींच्या आभासामागे महिलांसह तरुणींच्या देहाचा व्यापार जोरदार सुरु सुरू असल्याचे समोर आलं आहे. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या धक्कादायक तपासणीत उघडकीस आलेल्या सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटने (UAE human trafficking scandal) खोट्या आश्वासनांनी महिलांना गुलामीत ढकलल्याचे स्पष्ट केले आहे. हॉटेल वा सुपरमार्केटमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना दुबईत आणले जाते, मग कैद करून जबरदस्तीने सेक्स पार्ट्यांमध्ये ढकलले जाते. यात आफ्रिकन देशांतील महिला (Dubai sex trafficking African women) मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू हा या निर्दयी व्यवस्थेचा पुरावा आहे, तरीही अधिकृत नोंदींमध्ये तो आत्महत्येचा ठरवला गेला आहे. पैशांच्या बदल्यात degradation स्वीकारण्यास भाग पाडल्या जाणाऱ्या या स्त्रिया फक्त उपभोगासाठी ठरत आहेत. दुबईच्या चमकदार ब्रँडिंगमागे लपलेल्या या काळ्या वास्तवाने आंतरराष्ट्रीय पटलावर गल्फमधील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कायदे असूनही कारवाई नसल्याने अत्याचार करणाऱ्यांना बळ मिळते.
लैंगिक तस्करी आणि शोषण (Dubai Instagram influencers exploitation)
बीबीसी (BBC) वर्ल्ड सर्व्हिस डॉक्युमेंटरीने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एका लैंगिक तस्करी रॅकेटचा (sex trafficking ring) पर्दाफाश केला आहे, ज्यात परदेशी महिलांचे शोषण केले जाते. दुबईमध्ये लैंगिक तस्करीचा उद्योग वाढत असल्याचे आणि त्यात विशेषतः आफ्रिकन महिलांना त्रास दिला जातो, असे 2023 च्या रॉयटर्सच्या तपासात म्हटले आहे. Dubai PortaPotty ही डॉक्युमेंटरी #DubaiPortaPotty नावाची आहे. जी आता UAE मध्ये एक उघड गुपित बनली आहे. यामध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह (Instagram influencers) इतर महिलांना अपमानास्पद लैंगिक कृत्ये करण्यासाठी आणि मानवी शौचालय (human toilets) म्हणून काम करण्यासाठी भरमसाठ पैसा मोजला जातो.
महिलांना कसे फसविले जाते? (Women forced into sex parties in Dubai)
अनेक महिलांना हॉटेल्स आणि सुपरमार्केटमध्ये नोकरीच्या खोट्या बहाण्याने देशात आणले जाते. त्यानंतर, त्यांना तुरुंगात डांबून आणि जबरदस्तीने या कामासाठी भाग पाडले जाते. या रॅकेटसाठी काम करणाऱ्या दोन युगांडाच्या महिला, मोनिक करउनगी आणि कायला बिरुंगी, यांचा दुबईतील इमारतींवरून पडून मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी या दोन्ही मृत्यूंना आत्महत्या ठरवले, परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की या प्रकरणांची योग्य चौकशी झाली नाही. बीबीसीने (BBC) प्रयोगशाळेतील चाचण्यांची पडताळणी केली ज्यात असे दिसून आले की बिरुंगीच्या रक्तात अल्कोहोल किंवा ड्रग्सचे कोणतेही अंश नव्हते, जरी तसा दावा करण्यात आला होता.
महिलांना एका विकेंडसाठी 5,000 ते 50,000 डॉलर्स (Wealthy clients Demand)
तपासणीत असे दिसून आले की, श्रीमंत व्यावसायिक आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणारे उच्चभ्रू ग्राहक महिलांना मोठ्या रकमा देऊन अपमानास्पद कृत्ये करवून घेतात. काही महिला स्वेच्छेने, तर अनेकांना खोट्या नोकरीच्या आश्वासनांवर दुबईत बोलावून जबरदस्तीने या पार्ट्यांमध्ये ढकलले जाते. अहवालांनुसार, महिलांना एका विकेंडसाठी 5,000 ते 50,000 डॉलर्सपर्यंत पैसे दिले जातात, मात्र दलाल किंवा टोळ्यांकडून बहुतेक रक्कम हिसकावली जाते. या पार्ट्यांमध्ये महिलांना अश्लील आणि अमानवीय वर्तन सहन करावे लागते. काही प्रकरणांत महिलांचा मृत्यूही संशयास्पदरीत्या झाला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, लैंगिक तस्करीसाठी कठोर तुरुंगवासाची शिक्षा असूनही, अमिरातीचे अधिकारी या महिलांचे संरक्षण करण्यासाठी फारसे काही करत नाहीत. दुसरीकडे, UAE च्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवी तस्करीला सहन केले जात असल्याचे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या (US State Department) 2023 च्या अहवालानुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) सरकार तस्करीच्या निर्मूलनासाठी किमान मानकांची पूर्णपणे पूर्तता करत नाही, परंतु तसे करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Published at : 27 Sep 2025 11:44 AM (IST)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा
हॅलो गेस्ट
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
महाराष्ट्र
मराठवाड्यात रात्रभर पावसाचं थैमान! पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप, कुठे काय परिस्थिती ?
क्रीडा
AK-47 सेलिब्रेशनवर आयसीसीची सुनावणी, स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानी साहिबजादा फरहाननं थेट धोनी आणि कोहलीचं नाव का घेतलं?
लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक; थेट विमानातून राजस्थानच्या जोधपूर जेलला रवानगी
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दीड तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे काय फायदा होणार?
सांगली
पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी भाजप किसान मोर्चाकडून शंभर टन चारा व कडबा कुट्टीची मदत; मंत्री चंद्रकांत पाटलांंच्या उपस्थितीत पहिला ट्रक रवाना
लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!