देशातील सर्वात स्वच्छ हवा अमरावतीची; केंद्रीयमंत्र्यांच्याहस्ते गौरव, 75 लाख पारितोषिक | Amravati has the cleanest air in the country, honoured by Union Minister, 75 lakh prize
एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीअमरावतीदेशातील सर्वात स्वच्छ हवा अमरावतीची; केंद्रीयमंत्र्यांच्याहस्ते गौरव, 75 लाख पारितोषिक
देशातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून काही महिन्यांपूर्वी राजधानी दिल्लीची चर्चा होत होती. दिल्लीतील प्रदुषण हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.
By : प्रणय निर्बाण, एबीपी माझा | Updated at : 09 Sep 2025 09:52 PM (IST)
देशातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून काही महिन्यांपूर्वी राजधानी दिल्लीची चर्चा होत होती. दिल्लीतील प्रदुषण हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.
आता, केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेल्या शहरांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील अमरावती हेच क्रमांक 1 वर आहे.
देशात अमरावती शहराची हवा सर्वांत स्वच्छ असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. केंद्र सरकारकडून अमरावती शहाराला स्वच्छ वायू सर्वेक्षणात मानाचं पहिलं स्थान मिळालं आहे.
विदर्भातील अमरावती हे शहर देशातील सर्वात स्वच्छ असलेलं शहर असून शहराने पहिला क्रमांक पटकावत 75 लाखांचा पुरस्कार मिळवला आहे.
स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 या स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने 200 पैकी 200 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महापालिका आयुक्तांना 75 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रासह स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांनी ठेवलेली स्वच्छता हेच या यशामागचे गमक आहे.
Published at : 09 Sep 2025 09:52 PM (IST)
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा
हॅलो गेस्ट
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्ली ते काठमांडू विमानसेवा बंद, सरकारकडून भारतीयांसाठी अॅडव्हाईजरी जारी, हेल्पलाईनही नंबरही दिला
महाराष्ट्र
स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; राज्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना, कटकट मिटणार, शेतापर्यंत रस्ता होणार
New Vice President India महाराष्ट्राचे राज्यपाल बनले देशाचे नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं, इंडिया आघाडीचे खासदार फुटले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 सप्टेबर 2025 | मंगळवार
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती
राजकारण
फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे, तो सरकारचा बाप नाही”; छगन भुजबळांच्या पत्रावरून जरांगे पाटील संतापले
आशिया कप 2022
आशिया कपचे सामने मोबाईलवर कुठं पाहायला मिळणार, Live Streaming चा पत्ता बदलला, संपूर्ण मालिका इथं पाहता येणार