धुळ्यात तिहेरी अपघात! एसटी बस अन् दुचाक्या धडकल्या, भीषण दुर्घटनेत मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी | Dhule Triple Accident ST Bus Collides with Two Bikes Girl Killed Mother Critically Injured
एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीधुळेधुळ्यात तिहेरी अपघात! एसटी बस अन् दुचाक्या धडकल्या, भीषण दुर्घटनेत मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी
By : जयदीप मेढे | Updated at : 09 Sep 2025 03:06 PM (IST)
धुळ्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 40 एन 9014 क्रमांकाची बस साक्रीहून पिंपळनेरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी पिंपळनेरहून साक्रीकडे दोन दुचाकी (एमएच 39 एके 8546 आणि एमएच 18 बीवाय 5437) येत होत्या.
कान नदीच्या पुलावर बस आणि दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. या धडकेत लक्ष्मी दिनेश जयस्वाल (वय 12) हिचा मृत्यू झाला.
तर अपघातात जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली या घटनेबाबत साक्री पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Published at : 09 Sep 2025 03:06 PM (IST)
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा
हॅलो गेस्ट
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्राईम
संताप! बीड जिल्हा पुन्हा हादरला, परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार; 8 दिवसातील दुसरी घटना
कुणबी दाखले देण्यास कार्यवाही सुरू करा; मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, विखे पाटलांनी दिली माहिती
मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
क्राईम
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
क्राईम
मिरजमधील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून, गाव बंदची हाक
व्यापार-उद्योग
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
क्राईम
पुणे पोलीस आता आंदेकर गँगचं कंबरडं मोडणार, हितचिंतकांचाही समूळ नायनाट करणार, नेमकं काय झालं?
पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका