नाटक झालं हाऊसफुल्ल! आता रिअल लाइफ कपल मोठा पडदा गाजवणार | मनोरंजन – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
Last Updated:September 26, 2025 4:29 PM IST
मराठी इंडस्ट्रीतील हे रिअल लाइफ सेलिब्रेटी कपलच्या नाटकाला सध्या हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. हे रिअल लाइफ कपल आता मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत.
‘आमने सामने’, ‘इवलेसे रोप’, ‘तू अभीतक है हसीन’ यांसारकाही नाटके, मालिका आणि सिरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी हिट जोडी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
ही जोडी म्हणजे अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम. रंगभूमीवर एकमेकांना पूरक ठरणारी ही जोडी प्रेक्षकांसाठी आता एक सरप्राईज घेऊन येत आहे.
advertisement
‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून लीना भागवत, मंगेश कदम ही हिट जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेले मंगेश आणि लीना आता रुपेरी पडद्यावरही एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांची भन्नाट ऑन-स्क्रीन केमिस्ट्री व कमाल टाईमिंग नेहमीच अप्रतिम असल्याने ‘मना’चे श्लोक’ मध्ये त्यांची केमिस्ट्री पाहाणे देखील प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.
advertisement
अभिनेत्री लीना भागवत म्हणाली, “आम्ही पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणं ही नवी आणि सुंदर अनुभूती आहे. मला खात्री आहे प्रेक्षक आम्हाला मोठ्या पडद्यावरही तेवढंच प्रेम देतील.”
advertisement
अभिनेते मंगेश कदम म्हणाले, “नाटक आणि चित्रपटाचा अनुभव वेगळा असतो. मात्र लीनासोबत स्क्रीन शेअर करणं हे नेहमीच मजेशीर आणि समाधानकारक असतं. आमची जोडी एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.”
advertisement
‘मना’चे श्लोक’ हा सिनेमा 10 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमांत मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.
advertisement
‘मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..’, 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
View All
श्रीलंकेविरूद्ध सूर्या ‘हुकमी एक्का’ मैदानात उतरवणार,आशिया कपमध्ये एकही सामना खे
जे मिळवण्यासाठी आलियाला 20 वर्ष लागली, ते राहाने फक्त चौथ्याच वर्षी मिळवलं
चाकू हल्ल्यावर पहिल्यांदाच बोलला सैफ अली खान, सांगितलं नेमकं काय घडलं?
काऊंटडाऊन संपला! 27 सप्टेंबरपासून या राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि-सूर्य कृपा
व्यवसायासाठी धाडस दाखवलं, नोकरी सोडून सुरू केलं मधमाशी पालन, वर्षाला लाखात कमाई
आणखी पाहा
दादरची चवदार परंपरा; श्री कृष्ण आणि कैलास लस्सी आजही खाद्यप्रेमींची पहिली पसंती
श्रीलंकेविरूद्ध सूर्या ‘हुकमी एक्का’ मैदानात उतरवणार,आशिया कपमध्ये एकही सामना खे
10 दिवस, 36 मशीन्स अन् ₹3520000000… ट्रक भरून सापडली पैसे, भारतातील…
लडाखच्या रँचोला अटक, धक्कादायक कारण समोर; भाषणात नेमकं काय होतं?
आणखी पाहा
advertisement