पुण्यातील नाना पेठेत गँगवारची धक्कादायक घटना घडली आहे. वनराज आंदेकर टोळीतील मुख्य आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. गोविंद कोमकर या 19 वर्षीय मुलावर आंदेकर टोळीने तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गोविंद कोमकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात श्री लक्ष्मी हाऊसिंग सोसायटीतील इमारतीच्या पार्किंगमध्ये शनिवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास झालेल्या खुनी हल्ल्यात वनराज आंदेकर टोळीतील मुख्य