माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झालं, उपोषण सोडल्यानंतर काय म्हणाले जरांगे पाटील?

माझी लेकरं सुखी राहतील, | Manoj Jarange Patil News Today is a golden day for Maharashtra what did Manoj Jarange Patil say after ending his fast

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठबातम्यामहाराष्ट्रमाझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झालं, उपोषण सोडल्यानंतर काय म्हणाले जरांगे पाटील?

Manoj Jarange Patil : माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झाल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.

By :
गणेश लटके | Updated
at : 02 Sep 2025 07:04 PM (IST)

Manoj Jarange Patil
Source : Getty Images

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला यश आलं आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील प्रतिक्रिया दिली आहे. माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झाल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सुवर्णक्षण असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. याआधी विदर्भात आणि खानदेशात आपण नोंदी दिल्या असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 
मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलं आहे. या मागण्यांच्या संदर्भातील जीआर देखील सरकार काढणार आहे. सरकारचा मसुदा अभ्यासकांना देखील मान्य झाला आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय – मान्यआंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत – मान्यआंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी – मान्यमराठा आंदोलकांवरील केसेस मागे – मान्यप्रलंबित जात पडताळणीला मान्यता – मान्य आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता – मान्य
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी – 1 महिन्याची मुदतमराठा-कुणबी एकच शासन निर्णय – 2 महिन्यांची मुदत
हैद्राबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीस उपसमितीने मान्यता दिली आहे, याचा अर्थ हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याची सूचना उपसमितीकडून देण्यात येईल. सातारा गॅजेटबद्दल आपण मागणी केली होती, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठा यामध्ये येतो. औंध आणि सातारा मध्ये काही त्रुटी आहेत. पुढील 15 दिवसात कायदेशीर त्रुटीचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल, असे शासनाने म्हटले आहे. 

महत्वाच्या बातम्या: 
हैदराबाद गॅझेटचा ‘शासन निर्णय’ जसाच्या तसा; मराठवाड्यात गावातील, कुळातील नातेसंबंधांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार

Published at : 02 Sep 2025 07:04 PM (IST)

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

हॅलो गेस्ट

टॉप आर्टिकल
टॉप रील्स

गावातील, कुळातील, नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार, हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करणार; मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सांगता

राजकारण

फडणवीससाहेब, कटुता संपवूया, उपोषण सोडतो; 5 व्या दिवशी उपोषणाची सांगता, जरांगे पाटील म्हणाले, आता गावाकडं चला

करमणूक

गायक राहुल देशपांडेचा घटस्फोट; वैवाहिक आयुष्याची 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोठा निर्णय; मुलीबाबतही भाष्य

हैदराबाद गॅझेटचा ‘शासन निर्णय’ जसाच्या तसा; मराठवाड्यात गावातील, कुळातील नातेसंबंधांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार

पोलीस कारचा भीषण अपघात, वाहन पलटल्याने कारचे नुकसान; 1 पोलीस अंमलदार ठार, 2 जखमी

राजेहोss.. तुमच्या पाठिंब्याने जिंकलो, आपला विजय झाला, मनोज जरांगेंची घोषणा, जवळपास सर्वच मागण्या मान्य!

राजकारण

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्रिपदाचाही प्रश्न मार्गी लागेल; भरत गोगावलेंचं मिश्कील भाष्य

तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती

 

Author

Leave a Comment