‘मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो अन्…’, चाकू हल्ल्यावर पहिल्यांदाच बोलला सैफ अली खान, सांगितलं नेमकं काय घडलं? | मनोरंजन – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
Last Updated:September 26, 2025 3:29 PM IST
Saif Ali Khan attack : सैफ अली खानने एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
मुंबई: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान त्याच्या शांत आणि रॉयल स्वभावासाठी ओळखला जातो. पण, या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यासोबत त्याच्याच घरात एक धक्कादायक आणि भयावह घटना घडली होती.
advertisement
एका चोराने त्याच्या मुंबईतील घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या घटनेबद्दल सैफने आता एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
advertisement
सैफ अली खानने एस्क्वायर इंडियाला एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा त्याचे दोन्ही लहान मुलं, तैमूर आणि जेह घरात होते. सैफ जेहच्या खोलीत जमिनीवर जखमी अवस्थेत पडला होता.
advertisement
तो म्हणाला, “ती खूपच भीतीदायक भावना होती. मी जखमी अवस्थेत पडलो होतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं पूर्ण आयुष्य फ्लॅशबॅकसारखं फिरू लागलं होतं. मला वाटलं, आयुष्य किती सुंदर आहे! मला अनेक ठिकाणी फिरायला मिळालं, खूप चांगल्या आठवणी आहेत. माझी पत्नी, माझी मुलं… या सगळ्याबद्दल मी विचार करत होतो.”
advertisement
सैफने ही घटना एक चमत्कार असल्याचं म्हटलं आहे, कारण त्याला जास्त मोठी दुखापत झाली नाही.
advertisement
या हल्ल्यानंतर सैफने त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. तो म्हणाला, “मला कधीच सिक्युरिटी आवडली नाही, पण आता काही काळासाठी ती ठेवावीच लागेल. या घटनेतून मी एकच गोष्ट शिकलो की, नेहमी आपले दरवाजे बंद ठेवा आणि सावध राहा.”
advertisement
भावूक होत सैफ म्हणाला, “माझी जाण्याची वेळ अजून आली नव्हती. देवाने मला आणखी काही चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि काही दानधर्म करण्याची संधी दिली आहे.” दरम्यान, सैफवर हल्ला केल्याप्रकरणी, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
advertisement
कामाबाबत बोलायचं झालं तर, सैफ अली खानचा शेवटचा ‘ज्वेल थीफ: द हीस्ट बिगिन्स’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
advertisement
‘मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..’, 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
View All
व्यवसायासाठी धाडस दाखवलं, नोकरी सोडून सुरू केलं मधमाशी पालन, वर्षाला लाखात कमाई
1 तास 59 मिनिटांचा सर्वात भयानक सिनेमा, पाहून थरथर कापाल; नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग
कारचं मायलेज कमी झालंय का? ही आहेत 5 कारणं, एकदा पाहाच
आम्लपित्त आणि बद्धकोष्ठते वाढलाय? ‘हा’ घरगुती उपाय ट्राय करा, मिळेल आराम!
‘अपघात झाला तेव्हा दिघे साहेब माझ्या पुढच्या गाडीत होते’, 24 वर्षांआधी काय घडलं!
आणखी पाहा
चाकू हल्ल्यावर पहिल्यांदाच बोलला सैफ अली खान, सांगितलं नेमकं काय घडलं?
काऊंटडाऊन संपला! 27 सप्टेंबरपासून या राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि-सूर्य कृपा
व्यवसायासाठी धाडस दाखवलं, नोकरी सोडून सुरू केलं मधमाशी पालन, वर्षाला लाखात कमाई
पुणे पोलिसांचा बुलडोझर पॅटर्न, रेकॉर्डवरील आरोपीच्या मुळावर घाव,गुंडांमध्ये दहशत
आणखी पाहा
advertisement