Bollywood Actor Dating Ex-Wife : बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा लग्नाच्या आठ वर्षांनी घटस्फोट झाला असून आता हा अभिनेता त्याच्या एक्स-पत्नीला डेट करतोय.
मुंबई -बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची दोन-तीन लग्न झाली असून घटस्फोट झाले आहेत. सोहेल खान, आमिर खान, हृतिक रोशन, अरबाज खान यांसारख्या अनेक कलाकारांचे घटस्फोट झाले असून त्यापैकी काहींनी दुसरं लग्नसुद्धा केलंय. तर काही जण रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, असा एक बॉलिवूड अभिनेता आहेत, ज्याने लग्नाच्या आठ वर्षानंतर घटस्फोट घेतला. पण, आता तो त्याच्या एक्स-पत्नीलाच डेट करतोय. याबद्दल त्यानं मुलाखतीमध्ये सांगितलंय.
प्रिया मराठे फक्त अभिनेत्रीच नव्हती तर…प्रियाच्या अभिनयविश्व व खासगी आयुष्यातील फिल्मी गोष्टी ऐकाच
हाअभिनेता दुसरा तिसरा कुणीही नसून गुलशन देवैया आहे. गुलशनचं कॅलिराॅय सोबत २०१२ मध्ये लग्न झालेलं. ती एक ग्रीक नागरिक आहे. लग्नाच्या आठ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटानंतर दोघंही चांगले मित्र होते. आता त्यांनी त्यांच्या नात्याला दुसरी संधी देण्याचं ठरवलं आणि आता ते घटस्फोटानंतरही एकत्र आहेत. ‘ती भारतात फिरायला आली होती. त्यादरम्यान आम्ही भेटलो आणि प्रेमात पडलो. त्यावेळी ती युकेमध्ये राहत होती. ती ग्रीक नागरिक आहे. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केलं’ असं गुलशनने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर स्टार प्रवाहच्या आणखी एका मालिकेनं गुंडाळला गाशा; लवकरच प्रेक्षकांना करणार बाय-बाय टाटाइंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुलशन म्हणाला की, ‘एका काळानंतर आमचं वैवाहिक जीवन कठीण झालं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात असणं ही गोष्ट संसार करण्यासाठी पुरेशी नव्हती. लहान-लहान गोष्टींसाठी एकमेकांशी बोलायची, चर्चा करायची आमची इच्छा उरली नव्हती. मी अशा क्षेत्रात काम करतोय, जे खूप अस्थिर आणि आपल्या अंदाजापलीकडचं आहे. त्यामुळे मला व्यावसायिक गोष्टींचा समतोल साधण्यासाठी वैयक्तिक आयुष्यात स्थिरता पाहिजे होती. माझं लग्न, माझं नातं मला ती स्थिरता देऊ शकत नव्हतं, त्यामुळे मी निराश होतो, माझी प्रचंड चिडचिड होत होती.’
View this post on Instagram
‘कॅलिरॉयच्या पण काही अडचणी होत्या. ८ वर्षांच्या वैवाहिक जिवनानंतर एकमेकांसोबतच्या चांगल्या आठवणींसह अयशस्वी लग्न सांभाळण्यापेक्षा वेगळं होऊन एकमेकांपासून ब्रेक घ्यायचं आम्ही ठरवलं. त्यानंतर आम्हाला जाणवलं की, आमचं एकमेकांसाठी असलेलं प्रेम आजही आधीसारखंच आहे. त्यानंतर आम्ही मैत्रीपासूनपुन्हा सुरुवात केली. नंतर नातं नव्यानं सुरू करण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. त्या मैत्रीपासून सुरू झालेला प्रवास पुन्हा रिलेशनशिपपर्यंत येऊन पोहोचला. सध्या तरी पुन्हा लग्न करण्याबाबत काहीच विचार केलेला नाही.’ असं गुलशनने पुढे सांगितलं.