सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच विरारच्या विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंटचा मोठा भाग मंगळवारी रात्री उशिरा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या दुर्घटनेत १७ जण ठार झाले असून ९ रहिवासी गंभीर जखमी झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात हे विघ्न आल्याने विरारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या निमित्ताने वसई-विरारमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर […]