‘सन्मान केवळ माझा नाही…’ हिमाचल प्रदेश सरकारकडून विशेष गौरव, छाया कदम भावुक

‘सन्मान केवळ माझा नाही…’ हिमाचल प्रदेश सरकारकडून विशेष गौरव, छाया कदम भावुक | मनोरंजन – News18 मराठी

Trending:

Follow Us

Published by:

Last Updated:September 09, 2025 8:53 AM IST
Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम यांचा हिमाचल प्रदेश सरकारकडून विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान मिळाल्यानंतर छाया कदम यांनी भावुक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाची छाप केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवली. कान फिल्म फेस्टिव्हल सारख्या अनेक मोठ्या फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांच्या सिनेमाचा आणि अभिनयाचा गौरव करण्यात आला.

advertisement

छाया कदम यांच्या कामाची हिमाचल प्रदेश सरकारकजून घेण्यात आली. त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. छाया कदम यांनी भावुक पोस्ट लिहीत ही माहिती दिली.

advertisement

छाया कदम यांनी लिहिलंय, “हा केवळ माझा सन्मान नाही तर, माझ्या महाराष्ट्राचाही सन्मान आहे.”

advertisement

“11 व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी तर मिळाली. आणि सोबतच ‘लाल’ या माझ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग असल्यामुळे त्या आनंदात अजून भर पडली.”

advertisement

छाया कदम यांनी पुढे लिहिलंय, “या सगळ्या सोबतच एक विशेष गोष्ट अशी घडली की, मी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या वतीने माझा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.”

advertisement

“त्या सन्मानाच्या निमित्ताने दाखविण्यात आलेली माझी लहानशी डॉक्युमेंट्री मला भावनिकरित्या सुखावणारी होती. आणि अर्थात हा सन्मान केवळ माझा नाही तर ज्या मातीने माझ्यातला कलाकार घडविला त्या माझ्या महाराष्ट्राचाही आहे.”

advertisement

“या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश आणि शिमला मधील अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवता आल्या.”

advertisement

“इथली माणसं – त्यांचे गोड स्वभाव अनुभवता आले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथल्या लोकांचे सिनेमा कलाकृतीवर असलेले प्रेम अनुभवता आले. खूप आनंद आणि एक कलाकार म्हणून खूप समाधान.”

advertisement

पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
View All

धगधगतंय नेपाळ, Gen Z Proetst चे अंगावर काटा आणणारे 10 PHOTO

पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची विश्रांती

Online Money पाठवताना ‘या’ 5 गोष्टी नेहमी ठेवा, नाहीतर गमावाल मेहनतीचे पैसे

ना ब्लॅक, ना ग्रीन ट्रेंडिंग ठरतोय ‘व्हाईट टी’, तुम्ही प्यायला आहात का सफेद चहा?

वारं फिरलं, मराठवाड्यातून पावसाची माघार, 9 सप्टेंबरचा हवामान अंदाज

आणखी पाहा

उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला? 11 खासदारा

सातारा अन् कोल्हापूर गॅझेटियरमध्ये नेमकं काय लिहिलंय? ‘या’ नोंदीच देणार मराठा…

ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच दिला दगा, संभाजीनगरात 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार

पुणे मेट्रोला बाप्पा पावला! प्रवासी संख्येत तिप्पट वाढ, गणेशोत्सवात विक्रमी कमाई

आणखी पाहा
advertisement

 

Author

Leave a Comment