केंद्र सरकारला निलेश राणेंनी घरचा आहेर; म्हणाले, हा केवळ मराठ्यांचा प्रश्न नाही, तर गुजरातमध्ये पटेल, राजस्थानमध्ये गुजर, हरियाणामध्ये जाट थांबलेत…

​केंद्र सरकारला निलेश राणेंनी घरचा आहेर; म्हणाले, हा केवळ मराठ्यांचा प्रश्न नाही, तर गुजरातमध्ये पटेल, राजस्थानमध्ये गुजर, हरियाणामध्ये जाट थांबलेत… | Nilesh Rane on Maratha Reservation Criticized the central government mumbai maratha agitation maharashtra marathi news
image

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठबातम्यामहाराष्ट्रकेंद्र सरकारला निलेश राणेंनी घरचा आहेर; म्हणाले, हा केवळ मराठ्यांचा प्रश्न नाही, तर गुजरातमध्ये पटेल, राजस्थानमध्ये गुजर, हरियाणामध्ये जाट थांबलेत…

Nilesh Rane : प्रत्येक राज्यात आपआपापल्या कोट्यासाठी थांबले आहेत. अजून किती वर्ष आपण त्यांना थांबवणार आहोत? असे म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane)  यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Nilesh Rane on Maratha Reservation

Source : ABP Majha

Nilesh Rane on Maratha Reservation सिंधुदुर्ग : सरसकट आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं यावर सरकारने योग्य तो मार्ग काढायचा आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं, ही मागणी रास्त आहे. अनेक वर्षांपासून आम्ही देखील ही मागणी करत आलोय. मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे. ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षणाची (Maratha Reservation)  मागणी आहे, हा टेक्निकल मुद्या आहे. ही प्रक्रिया असून कायद्याची प्रक्रिया आहे. घटनेच्या अधिकारातून या तरतूदी कराव्या लागणार आहेत. जे तज्ञ आहेत त्यांना यावर मार्ग काढावा लागेल. हा फक्त मराठ्यांचा प्रश्न नाही, तर देशातील इतर राज्यांमध्ये देखील अनेक जातीचे लोक थांबले आहेत. गुजरातमध्ये पटेल थांबलेत, राजस्थानमध्ये गुजर, हरियाणामध्ये जाट थांबले. त्यामुळे याचा कधी ना कधी आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्येक राज्यात आपआपापल्या कोट्यासाठी थांबले आहेत. अजून किती वर्ष आपण त्यांना थांबवणार आहोत? याचा विचार राज्य आणि केंद्र सरकारला करावा लागेल. असे म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane)  यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मनोज जरांगे यांच्यासोबत जीवाभावाचे संबंध, ते माझं ऐकतील- निलेश राणे

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणावरील आंदोलनाबाबत बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले कि, आरक्षणाचा विषय सुटला पाहिजे. विषय दुसरीकडे जाऊ नये. चांगल्या वातावरणात आपली मागणी धरा, असा सल्ला मनोज जरांगे यांना दिलाय. मनोज जरांगे यांच्यासोबत जुनी ओळख आहे, जीवाभावाचे संबंध आहेत. म्हणून मी त्यांना सांगू शकतो, आणि ते माझं ऐकतील, अस मला वाटतं. कारण जुने संबंध आहेत, आणि ते विसरलो नाहीत आणि तेही विसरलेले नसतील.

गणरायाने नेहमीच आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. मी निवडून यावं म्हणून कार्यकर्त्यांनी नवस केला होता, तो नवस देखील फेडला. सिंधुदुर्गावर, महाराष्ट्रावर, देशावर कोणतेही संकट येऊ नये, एव्हढे गणरायाजवळ मागण केलं. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी गणरायाकडे मागणी मागत असतात. असेही निलेश राणे म्हणाले.

आणखी वाचा 

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

हॅलो गेस्ट

टॉप आर्टिकल

टॉप रील्स

Maratha Protest Manoj Jarange: मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

तीनपर्यंत आझाद मैदान खाली करणं शक्य नाही, मराठा आंदोलकांची भूमिका; म्हणाले, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, थांबण्यात रस नाही, पण..

तीनपर्यंत आझाद मैदान खाली करणं शक्य नाही, मराठा आंदोलकांची भूमिका; म्हणाले, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, थांबण्यात रस नाही, पण..

Rohit Pawar on Manoj jarange Patil Mumbai Morcha : निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

Mumbai Maratha Protest:  मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

Beed Crime: परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Mumbai Maratha Protest: मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार

मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता; पुण्या - मुंबईसह IMDचे ठिकठिकाणी तीव्र इशारे

पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता; पुण्या – मुंबईसह IMDचे ठिकठिकाणी तीव्र इशारे

Mumbai Police Maratha Protest: मुंबई पोलिसांची जोरदार कारवाई, मराठा आंदोलकांच्या पार्किंगमधील गाड्याही हटवल्या, हालचालींना वेग

मुंबई पोलिसांची जोरदार कारवाई, मराठा आंदोलकांच्या पार्किंगमधील गाड्याही हटवल्या, हालचालींना वेग

 

Author

Leave a Comment