Manoj Jarange Patil Mumbai Protest : न्यायालयाची आजची उर्वरित सुनावणी उद्यावर गेली आहे. त्याआधी ३ वाजता आझाद मैदानावर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलं आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई व आझाद मैदान रिक्त करा अशा सुचना मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक व जरांगे पाटलांना दिल्या होत्या.
दरम्यान, न्यायालयाची आजची उर्वरित सुनावणी उद्यावर गेली आहे. त्याआधी ३ वाजता आझाद मैदानावर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलं आहे.
या मंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.
मागण्यांबाबत शिष्टमंडळानं काय केलं?१. हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणीला सहमती दर्शवली. तासाभरात जीआर काढणार- जरांगे पाटील
२. सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीला सहमती, जीआर महिन्याभरात काढण्याचं आश्वासन
३. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठीचा जीआर तात्काळ काढला जाणार
या शिवाय आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची मागणी मान्य
दरम्यान, जरांगे पाटलांनी वंशवळ समिती गठित करणे ज्यामध्ये मोडी, फारसी, उर्दू लिपीचे अभ्यासक असावेत ते स्वखर्चाने काम करतील असंही यावेळी सांगितलं.
याशिवाय, सगेसोयऱ्यांची छाननी करण्याचा मुद्द्यासह मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर काढण्यास संमती
Web Title: Manoj jarange patil reservation protest mumbai state government agree to implementation of their demands spl
ताज्या बातम्या
धनश्री वर्माने डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत असताना रणबीर कपूरच्या दातांवर केलेले उपचार; अनुभव सांगत म्हणाली, “त्याचं तोंड…”
तुम्ही नेहमी रागात किंवा चिंतेत असाल तर लगेच खा हे ५ पदार्थ, झटक्यात प्रसन्न होईल मन, मानसिक थकवा होईल दूर
Maratha reservation movement : ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’,वाहने हटविण्यास सुरुवात करताच आंदोलक आक्रमक
Manoj Jarange : मराठा-कुणबी एक, सगेसोयरे ते सरकारी नोकरी…, मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्या? वाचा संपूर्ण यादी!
तुम्ही मनोज जरांगेंच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहात? मराठा आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले