तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती

​Manoj Jarange Protest : तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती | maratha upsamiti maratha reservation draft Radhakrishna Vikhe Patil to meet manoj jarange protest azad maidan
image

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठबातम्यामुंबईManoj Jarange Protest : तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती

Mumbai Maratha Reservation Protest : राज्य सरकारची मराठा उपसमिती आता मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेमधून तोडगा निघेल अशी आशा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Mumbai Maratha Reservation Protest

Source : ABP Majha Digital

मुंबई : मनोज जरांगे यांच्या मागण्यावर उपसमितीने चर्चा केली असून त्यावर अंतिम मसुदा तयार केला आहे. तो मसुदा आता लवकरच मनोज जरांगे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या संबंधित चर्चा करुन मार्ग काढणार असून मनोज जरांगे त्याला प्रतिसाद देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे.

मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपसमिती जाणार आहे अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे यांच्यासह काही महत्त्वाचे नेते या समितीत असतील अशी माहिती विखेंनी दिली.

उपसमितीच्या वतीने आम्ही भेट घेणार

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संबंधी निर्णय हा उपसमितीला घ्यायचा आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेवर पुन्हा आमच्यामध्ये चर्चा झाली. कायद्याच्या चौकटीत गोष्टी कशा बसतात यावर चर्चा केली. त्यानंतर आता अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून तो जरांगे यांना देण्यात येणार आहे.

आझाद मैदान रिकामे करण्याच्या न्यायालयाच्या सूचना

या आधी सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश सरकारला दिले होते. लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून ते घराबाहेर पडू शकत नाहीत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. त्यामुळे प्रशासनाने मैदान रिकामं करावं, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरुन आढावा घेऊ अशा इशाराही दिला होता.

मराठा समन्वयकांकडून आंदोलकांना आवाहन

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा समन्वयकांकडून आंदोलकांना रस्ते रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले. कुणालाही त्रास होऊ नये, त्यामुळे रस्ते रिकामे करा, रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्या अडवू नका असं आवाहन करण्यात आलं.

आझाद मैदान सोडणार नाही

आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखतो, त्यांच्या निर्देशानुसार सर्व रस्ते रिकामे केले. पण मनोज जरांगे आझाद मैदान सोडणार नाहीत असं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

हॅलो गेस्ट

टॉप आर्टिकल

टॉप रील्स

Manoj Jarange Protest : तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती

तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती

Maratha Protest Manoj Jarange: मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा थेट इशारा

मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा थेट इशारा

तीनपर्यंत आझाद मैदान खाली करणं शक्य नाही, मराठा आंदोलकांची भूमिका; म्हणाले, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, थांबण्यात रस नाही, पण..

तीनपर्यंत आझाद मैदान खाली करणं शक्य नाही, मराठा आंदोलकांची भूमिका; म्हणाले, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, थांबण्यात रस नाही, पण..

Rohit Pawar on Manoj jarange Patil Mumbai Morcha : निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

Mumbai Maratha Protest:  मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

Beed Crime: परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Mumbai Maratha Protest: मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार

मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार

 

Author

Leave a Comment