Ganesh Visarjanachya Shubhecha In Marathi : आम्ही तुमच्यासाठी गणेश विसर्जन 2025 शुभेच्छा मराठीत तयार केल्या आहेत. या तुम्ही WhatsApp, Facebook किंवा इतर सोशल मीडियावर सहज शेअर करू शकता.
गणपतीचे आगमन झाल्यानंतर दहा दिवसांचा काळ हा खऱ्या अर्थाने पर्वणी मानला जातो. गोडाधोडाचे नैवेद्य, लाडू-मोदक आणि फुलांच्या आरासेमुळे प्रत्येक घर उजळून निघते.पहिल्या दिवशी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दहा दिवस भक्तिपूर्वक पूजा, आरती आणि प्रार्थना केली जाते. काही जण दीड दिवस, अडीच दिवस, पाच किंवा सात दिवसांचे बाप्पा ठेवतात आणि आनंदाने निरोप देतात.आज अवघ्या काही क्षणांत आपल्या गौरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे. निरोप घेताना मन जड होतं, पण पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत हीच भक्तांची मनापासून इच्छा असते. या प्रसंगी आपल्या प्रियजनांना WhatsApp, Facebook किंवा सोशल मीडियावरून खास शुभेच्छा शेअर करा आणि गणेशोत्सवाचा हा निरोप संस्मरणीय बनवा.
गणरायांना निरोप देताना मन खरंच जड होतं, पण आशा आहे पुढच्या वर्षी बाप्पा लवकरच येतील. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!”
“गौरी-गणपतीचे आगमन जसे आनंद घेऊन येते, तसेच त्यांचा निरोपही आशेचा किरण देतो. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया!”
“बाप्पाच्या चरणी सगळ्या इच्छा पूर्ण होवोत, आयुष्य सुख-समाधानाने भरून जावो. गणपती बाप्पा मोरया!”
“गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर घर रिकामं वाटतं, पण मनात मात्र बाप्पाच्या आठवणी कायम राहतात. पुढच्या वर्षी भेटूया!”
“गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा! तुमचं आयुष्यही बाप्पाच्या मूर्तीप्रमाणे तेजस्वी आणि पवित्र राहो हीच प्रार्थना.”
गणरायाच्या चरणी केलेली प्रार्थना तुमचं आयुष्य मंगलमय करो. विसर्जनाच्या शुभेच्छा!”
“निरोप घेताना डोळे पाणावतात, पण मनामध्ये पुढच्या वर्षी पुन्हा भेटायची आस असते. गणपती बाप्पा मोरया!”
“गौरी-गणपतीच्या आगमनाने घर आनंदाने भरून जातं, आणि विसर्जनाच्या वेळी आशिर्वाद सोबत घेऊन जातात. शुभेच्छा!”