निर्णय: बाप्पांच्या निरोपासाठी डीजे शांत, यंदा ढोल-ताशांचा होणार गजर, प्रशासनाच्या आवाहनानंतर डीजे असोसिएशन एक पाऊल मागे

गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज शांत राहणार आहे. पालकमंत्र्यांसह प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर डीजे असोसिएशनने विसर्जन मिरवणुकीतून एक पाऊल मागे घेतल्याने हजारो डीजे ऑर्डर रद्द झाल्या आहेत. या निर्णयामुळे गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजराला प्राधान्य दिले. यंदा ढोल-ताशांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. | divyamarathi

Author

Leave a Comment