
मराठी माणसांविषयी अवमानकारक धमकीची भाषा वापरणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आता मंदिरातही मस्ती केली आहे. झारखंडमधील देवधर येथील प्रसिद्ध वैद्यनाथ धाम मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून दुबेंनी पूजा केली. तसेच पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी दुबे यांच्यासह दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावणात देशभरातील प्रमुख महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी होत आहे. […]