Lakshman Hake: मुंबईत ओढावलेल्या परिस्थितीला आंदोलनाचे आयोजक जबाबदार, कायद्याचा बडगा दाखवा, लक्ष्मण हाके संतापले | Lakshman Hake Slams Maratha Agitation Holds Organizers Responsible for Mumbai Chaos Demands Strict Action
एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठबातम्याराजकारणLakshman Hake: मुंबईत ओढावलेल्या परिस्थितीला आंदोलनाचे आयोजक जबाबदार, कायद्याचा बडगा दाखवा, लक्ष्मण हाके संतापले
Lakshaman Hake: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यासाठी ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासून उपोषणास सुरुवात केली. मराठा,ओबीसी आरक्षणाच्या मागणीमुळे आता राजकीय पटलावर वातावरण तापलं आहे
Source : ABPLIVE AI
Lakshman Hake : मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत .या आंदोलनाला आता गुंडाळण्याच्या हालचाली सरकार व पोलीस प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत . मुंबई पोलिसांपाठोपाठ आता उच्च न्यायालयाकडूनही जर रांगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे .आंदोलनाची परवानगी नसेल तर तात्काळ जागा खाली करा अन्यथा तीन वाजता उच्च न्यायालय या संदर्भात आदेश काढेल असे हायकोर्टाच्या खंडपीठाकडून सांगण्यात आले होते . दरम्यान यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिलीये .शासन प्रशासनांनी जरांगे आणि समर्थकांना मुंबईत यायलाच द्यायला नको होतं .झुंडशाहीच्या मार्गाने सगळे आले आहेत .गेल्या दोन-चार दिवसांपासून मुंबईमध्ये जी परिस्थिती ओढवली आहे त्याला या आंदोलन सांभाळणारी माणसे जबाबदार असल्याचं हाके म्हणालेत .
ज्या गावातून मराठा आंदोलनाचे रूप व्यापक झाले त्यानंतरवली सराटी येथे आता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यासाठी ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासून उपोषणास सुरुवात केली . मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीमुळे आता राजकीय पटलावर वातावरण तापलं आहे .
काय म्हणाले लक्ष्मण हाके ?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले,’ कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे .न्यायिक व्यवस्था श्रेष्ठ असते .यांची गुंडशाहीची सुरू आहे .यांची पार्श्वभूमी पाहता मुंबई वेठीस धरणार हे होणार होतं .शासन प्रशासनांनी यांना मुंबईत यायला द्यायला नको होत .झुंडशाही मार्गाने सगळे आले आहे .गेल्या दोन चार दिवसापासून मुंबईमध्ये जी परिस्थिती उडवली आहे त्याला या आंदोलन सांभाळणारी माणसे जबाबदार आहेत .जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घ्या .जर कायदा कोणी पाळत नसतील तर त्यांना कायद्याचा बडगा पहिल्यांदा दाखवा .सरकारला असला कुठलाही जी आर काढायचा अधिकार नाही. न्यायालयापेक्षा कोणी मोठे समजू नये. ओबीसी आरक्षण घालण्याचा घाट घातला जात आहे का शरद पवार,उद्धव ठाकरे,सुप्रिया सुळे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाने एक प्रश्न सोडवण्यासाठी दहा प्रश्न उभे करत आहे. ‘ असे हाके म्हणाले .
कोर्टाच्या आजच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे!
1) तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश.
2) सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट
3) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही.
4) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत.
5) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola









