लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आला धक्कादायक अनुभव, तरुणी म्हणतेय, मरता मरता वाचले, पाहा व्हिडीओ

एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तिनं धक्कादायक अनुभव शेअर केला. हा अनुभव सांगताना ती म्हणाली, “मी मरता मरता वाचले.”
लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक मुंबईत येतात. हा गणपती बाप्पा नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अर्थातच दर्शन घेताना चेंगराचेंगरीही होते. काही वेळा तर मंडळांतील कार्यकर्त्यांसोबत भाविकांची हाणामारीसुद्धा होते. असे कितीतरी व्हिडीओ दरवर्षी व्हायरल होतात.
असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आलेला अनुभव नेटकऱ्यांसोबत शेअर करत आहे. ती म्हणते, ‘मरता मरता वाचले.’(फोटो सौजन्य – officialkomalyadav.07/Instagram)

लालबाग-परळ हा परिसर गणेशोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो, कारण या परिसरात गणेशगल्ली, तेजुकाया, चिंचपोकळीचा चिंतामणी, नरे पार्कचा राजा, रंगारी बदक चाळ असे एकापेक्षा एक अनेक सार्वजनिक गणपती आहेत. यापैकी प्रत्येक गणपती किमान ८० ते ९० वर्षांहून अधिक जुना आहे. त्यामुळे या भागात अफाट गर्दी असते आणि ही गर्दी शेवटी लालबागच्या राजाला पाहण्यासाठी एकवटते, ज्यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. असाच काहीसा अनुभव या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील तरुणीने घेतला. गर्दीमध्ये तिचा श्वास अक्षरशः कोंडला.​(फोटो सौजन्य – officialkomalyadav.07/Instagram)

View this post on Instagram


हा व्हिडीओ officialkomalyadav.07 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील तरुणी लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन बाहेर पडली आणि त्यानंतर ती म्हणाली, “मी मरता मरता वाचले.” खरं तर तिने ही फक्त दोनच वाक्यं उच्चारली, पण तिचे हावभाव पाहता तिचा श्वास कोंडला होता. प्रचंड गर्दीमध्ये ती गुदमरली होती, असं दिसतंय. तिचा हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ६७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Author

Leave a Comment