
बिहारमधील मतदार फेरतपासणीच्या मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत गदारोळ सुरू असतानाच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कागद फाडून अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने भिरकावले. त्यावरून वातावरण तापले आणि गोंधळात भर पडली. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहांचे कामकाज 18 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले. सायंकाळी साडेचार वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच हा गोंधळ झाला. […]