Who is lawyer Satish Maneshinde : सलमान-शाहरुखचे खटले लढले, संजय दत्तला वाचवलं, मराठ्यांनी मैदानात उतरवलेले वकील सतीश मानेशिंदे कोण? | Who is lawyer Satish Maneshinde who was fielded by the maratha morcha mumbai manoj jarange patil marathi news
एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीमुंबईWho is lawyer Satish Maneshinde : सलमान-शाहरुखचे खटले लढले, संजय दत्तला वाचवलं, मराठ्यांनी मैदानात उतरवलेले वकील सतीश मानेशिंदे कोण?
Who is lawyer Satish Maneshinde : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोध दाखल याचिकेवर काही वेळातच सुनावणी होत आहे. सतीश मानेशिंदे मराठा आंदोलकांची बाजू कोर्टात मांडणार आहेत.
By : किरण महानवर | Updated at : 02 Sep 2025 01:53 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोध दाखल याचिकेवर काही वेळातच सुनावणी होत आहे. दरम्यान यासाठी मराठ्यांनी ताकद लावली आहे, या सुनावणीमध्ये बाजू मांडण्यासाठी मोठा वकील मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सतीश मानशिंदे मराठा आंदोलकांची बाजू कोर्टात मांडणार आहेत.
सतीश मानेशिंदे हे देशातील हाय प्रोफाईल क्रिमिनल वकील म्हणून ओळखले जातात. अनेक नामांकित बॉलीवूड कलाकारांचे खटले त्यांनी लढले आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला असो वा संजय दत्त, सलमान खान यांसारख्या सुपरस्टार्सचे प्रकरण असो, सतीश मानेशिंदे हे नाव सतत चर्चेत राहिले आहे.
सतीश मानेशिंदे यांचा मूळ गाव कर्नाटकमधील धनोआ आहे. इथेच त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे मुंबई गाठली. 1983 साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी देशातील दिग्गज वकील राम जेठमलानी यांना तब्बल दहा वर्षे असिस्ट केले.
या काळात त्यांनी वकिलीतील बारकावे, दांवपेच आत्मसात केले. त्यानंतर सतीश मानशिंदे यांनी राजकारणी तसेच हाय प्रोफाईल क्लायंट्सचे खटले स्वीकारायला सुरुवात केली.
सतीश मानेशिंदे यांचे नाव प्रथम मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले ते 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात. या प्रकरणात त्यांनी अभिनेता संजय दत्त यांची बाजू मांडली होती. कायदेशीर दांवपेचांमुळे संजय दत्त यांना जामिन मिळाला.
2002 मध्ये सतीश मानेशिंदे यांनी अभिनेता सलमान खान यांचेही काही महत्त्वाचे खटले हाताळले. काळवीट शिकार प्रकरणात तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्यांनी सलमान खान यांना जामिन मिळवून दिला. यानंतर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सलमान खान निर्दोषही सुटले.
सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर झालेल्या तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला घेतल्यामुळे सतीश मानेशिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, सतीश मानेशिंदे एका सुनावणीसाठी 10 लाख रुपये घेतात.
Published at : 02 Sep 2025 01:53 PM (IST)
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा
हॅलो गेस्ट
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?
राजकारण
निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका
बातम्या
मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले
परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार
महाराष्ट्र
पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता; पुण्या – मुंबईसह IMDचे ठिकठिकाणी तीव्र इशारे
मुंबई पोलिसांची जोरदार कारवाई, मराठा आंदोलकांच्या पार्किंगमधील गाड्याही हटवल्या, हालचालींना वेग
मराठा आंदोलनात समाजकंटकांची घुसखोरी, आंदोलन बदनाम करण्याचा कट; सकल मराठा समाजाचा आरोप