Beed Farmer : अजितदादांची भेट, मदतीचा रिअॅलिटी चेक Special Report

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रBeed Farmer : अजितदादांची भेट, मदतीचा रिअॅलिटी चेक Special Report

By : abp majha web team  | 26 Sep 2025 11:38 PM (IST)

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावात सिंधपाणा नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. खरीपाची पिके पूर्णपणे वाहून गेली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतीची माती पूर्णपणे खरबुंद झाल्याने पुढील वर्षापर्यंत पीक येण्याची शक्यता नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी काल गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाने सध्या गहू पाच किलो आणि तांदूळ पाच किलो तसेच ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तत्काळ पाच हजार रुपये मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही मदत एक-दोन दिवसांत मिळेल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, मिळालेली मदत अपुरी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. “सरकार तुमच्या पाठीशी आहे, आम्ही मदत पुरवतो,” असे आश्वासन देण्यात आले आहे. कापूस आणि ऊस यांसारखी पिके वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत.

महाराष्ट्र

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, ‘कोहीनूर’ ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment