Brain stroke: ब्रेन स्ट्रोक ठरतोय देशातील मृत्यूचे चौथे प्रमुख कारण

न्यूरोसर्जन डॉ. बटुक दियोरा यांनी सांगितले की, ब्रेन स्ट्रोक हा अधिक सामान्य स्ट्रोक असून जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या धमन्यांपैकी एक रक्ताच्या गुठळ्यामुळे ब्लॉक होते तेव्हा ही समस्या होते. यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि मेंदूच्या मृत पावतात. दुसरा प्रकार म्हणजे हेमोरेजिक स्ट्रोक. जिथे मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे रक्तस्त्राव होतो बहुतेकदा उच्च रक्तदाबामुळे ही समस्या उद्भवते. ब्रेन स्ट्रोक हे भारतात, विशेषतः तरुणांमध्ये मृत्यू आणि अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहे.
 

Author

Leave a Comment