Buldhana Accident News : बुलढाण्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. अपघात इतका भयंकर होता, वाहनाचा चक्काचूर झाला असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अमोल सराफ, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मारुती ईको कार आणि ट्रेलरमध्ये झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे.
भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूरजवळ रात्री राष्ट्रीय महामार्गावरभीषण अपघातझाला. ज्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत कारचालकाची ओळख पटली आहे. कार चालक साजिद अजीज बागवान (मृतकांमध्ये) आणि तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. मारुती ईको कार MH 46 X 3120 आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात येत ट्रेलरला पाठीमागून धडकली. पाच प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींमध्ये संतोष तेजराव महाले (जळगाव जिल्हा), पंकज दिलीप गोपाळ, दीपिका विश्वास (पश्चिम बंगाल), टीना अजय पाटील (भुसावळ) यांचा समावेश आहे.Parbhani News : मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेला GR रद्द होण्याची भीती, उच्चशिक्षित तरुणाचं भयंकर कृत्य; कुटुंबावर शोककळा
रात्रीचे प्रवास सुसाट वेग आणि अपघात
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरचिखली-रणथम मार्गावर ही भीषण दुर्घटना घडली. हा अपघात रात्री जवळपास ११ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान घडला.मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनाने प्रवास करत असलेल्या कुटुंबाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात तीन महिलांसह एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींना पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
भाजप नेते हाजी अराफत शेख यांचा अपघात; पायाला दुखापत, ताफ्यातील अनेक गाड्यांचे नुकसान
अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र सुसाट वेग आणि अंधार असल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.