Chandrapur Accident News | वेकोलि निलजई खदान परिसरात मातीचा ढिगारा कोसळला : स्कॉर्पियो, ट्रक मलब्यात गाडले

स्कॉर्पियोमध्ये चार युवक प्रवास करत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या युवकांनी कसाबसा मागच्या दरवाजातून बाहेर पडून आपला जीव वाचवला. हे सर्वजण उकनी गावातील रहिवासी असल्याचे समजते. मात्र त्यांची गाडी पूर्णपणे मातीखाली दडपली. याचप्रमाणे, वंदना ट्रान्सपोर्टचा १८ चाकांचा ट्रकही मलब्याखाली अडकला आहे.
या दुर्घटनेमुळे निलजाई–घुग्घुस मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पाळीतील खदान कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने पर्यायी मार्गाने मॅनपॉवर बसमधून घरी पाठवावे लागले. दरम्यान, वेकोलि प्रशासनाने युद्धस्तरावर मदतकार्य सुरू केले असून जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र सततच्या पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत. कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतील दुर्घटना आणि त्यानंतर काल भूगोल परिसरातील खाणीतील नितीन दुर्घटनाणी वेकोलीच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
 

Author

Leave a Comment