Chandrapur Crime| कंत्राटी कामगार असल्याचे भासवून कॉपर केबलची चोरी : टोळीला २४ तासांत अटक

त्यांच्याकडे तपास करताना चोरीस गेलेले कॉपर केबल किंमत ₹२४,००,०००, तसेच वाहन, हेलमेट, रिफ्लेक्टर, जॉकेट, प्लॉस्टिक बॅरिकेड यांसह एकूण ₹ ४४,४८,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी दुरुस्तीच्या कामाच्या नावाखाली स्वतःला कंत्राटी कामगार असल्याचे भासवून वायर चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात, सपोनि दिपक कॉक्रेडवार व अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी केली.
 

Author

Leave a Comment