Dharashiv Collector Dance : धाराशिवचे जिल्हाधिकारी Kirtikiran Pujara आणि उपजिल्हाधिकारी Shobha Jadhav यांच्या नृत्यावर टीका

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रDharashiv Collector Dance : धाराशिवचे जिल्हाधिकारी Kirtikiran Pujara आणि उपजिल्हाधिकारी Shobha Jadhav यांच्या नृत्यावर टीका

By : abp majha web team  | 26 Sep 2025 10:42 PM (IST)

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, शेती खरडली गेली आहे, पिके, घरे आणि जनावरे वाहून गेली आहेत. शेतकरी मोठ्या नैराश्यात आहेत. धाराशिव जिल्ह्याला या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा स्थितीत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव एका कार्यक्रमात नाचताना दिसले. सकाळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर रात्री तुळजापूरमधील नवरात्र महोत्सवात ते सहभागी झाले. स्टेजवर गाण्यावर ठेका धरताना आणि नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी टीका केली आणि सत्ताधाऱ्यांनी कान टोचले. त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “कलाकारांना प्रोत्साहन देताना तल्लीन झाल्यामुळे हा प्रकार घडला. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.”

महाराष्ट्र

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, ‘कोहीनूर’ ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment