Dharashiv Heavy Rain Alert | धाराशिवमध्ये पावसाचा जोर वाढला, नागरिकांचे स्थलांतर सुरू

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रDharashiv Heavy Rain Alert | धाराशिवमध्ये पावसाचा जोर वाढला, नागरिकांचे स्थलांतर सुरू

By : abp majha web team  | 27 Sep 2025 11:50 AM (IST)

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने बेमळी बोरखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. “यावरून कोणीही प्रवास करू नये,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बागेगव्हाण गावामधून नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू केले आहे. भूम आणि परंडा तालुक्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले आहे. पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता, दोन अतिरिक्त पथके बोलावण्यात आली आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनानंतर स्थलांतर सुरू केले असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. संभाव्य धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, ‘कोहीनूर’ ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment