Dombivali Accident : महापालिकेच्या गाडीने वृद्ध महिलेला चिरडलं,अपघाताची थरार घटना CCTVत कैद

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या छेडा रोडवरून एक वृद्ध महिला चालत जात होत्या.या दरम्यान त्यांच्या मागून येणाऱ्या एका ट्रकने वृद्ध महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे.या घटनेत वाहन चालकाचे लक्ष नसल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या घटनेत ज्या ट्रकने महिलेला चिरडलं होतं.हा ट्रक महापालिकेचा होता. महापालिका शहरभर पथदिवे लावण्यासाठी या वाहनांचा वापर करायची.

advertisement

या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.तसेच या घटनेनंतर वाहन चालकाने महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची तसदी देखील दाखवली नसल्याची माहिती आहे. याउलट तो घटनास्थळी गाडीतच बसला होता. ही घटना स्थानिकांनी पाहिल्यानंतर तत्काळ हालचाली करत अपघातग्रस्त महिलांच्या मुलाला बोलावून घेतलं.त्यानंतर महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेच्या पाऊन तास उलटल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.या घटनेनंतर आता पोलीस वाहनचालकावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

हेडफोनमुळे गेला जीव 
भांडुपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव दीपक पिल्ले (17) असे आहे. दीपक हा एलबीएस मार्गावरून आपल्या घराकडे जात होता. मात्र, रस्त्याच्या कडेला महावितरणची हाय-टेन्शन वायर खुली अवस्थेत पडलेली होती.पावसामुळे रस्त्याला चिखल आणि पाणी साचले होते. या वायरच्या संपर्कात येताच दीपकला जोरदार शॉक बसला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

advertisement

स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कानात हेडफोन घालून चालत होता. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर दिलेला इशारा त्याच्या कानावरच गेला नाही. काही लोकांनी त्याला मोठ्याने हाक मारून धोका टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र हेडफोनमुळे त्याला काहीच ऐकू आलं नाही आणि तो थेट विजेच्या तारेच्या संपर्कात गेला.
याच ठिकाणी अनेक नागरिक प्रवास करत असतात. स्थानिकांनी जागरूकता दाखवत, इतरांना बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला. मात्र दीपकला वाचवणे शक्य झाले नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivali Accident : महापालिकेच्या गाडीने वृद्ध महिलेला चिरडलं,अपघाताची थरार घटना CCTVत कैद

 

Author

Leave a Comment