E-bike Taxi: ई-बाइक टॅक्सीला हिरवा कंदील, किती असेल भाडं? वाचा A टू Z माहिती | महाराष्ट्र – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
local18
Last Updated:September 26, 2025 11:11 AM IST
E-bike Taxi: ई-बाइक टॅक्सी सेवेची सुरुवात मुंबई शहरापासून होणार आहे.
E-bike Taxi: ई-बाइक टॅक्सीला हिरवा कंदील, किती असेल भाडं? वाचा A टू Z माहिती
मुंबई: पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक वाहनांमुळे दिवसेंदिवस वायू आणि ध्वनी प्रदुषणात वाढ होत आहे. त्यामुळे आता ईलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारण्यावर शासन भर देत आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांत ईलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्याला सरकारने एप्रिल 2025 मध्ये मान्यता दिली आहे. ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी परिवहन विभागानेदेखील मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच शहरात ई-बाइक टॅक्सी धावताना दिसणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ई-बाइक टॅक्सी सेवेची सुरुवात मुंबई शहरापासून होणार आहे. त्यानंतर त्याची सर्व ठिकाणी अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सरकारी नियमांनुसार 12 वर्षांवरील सर्व प्रवासी ई-टॅक्सीमधून प्रवास करू शकतील.
Metro 2B: मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका होणार सुरू! कुठून ते कुठपर्यंत धावणार?
advertisement
किती असेल भाडं?
ई-बाइक टॅक्सीचा वापर करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी शासनाने भाड्याचे दर निश्चित केले आहेत. चालकांना त्यानुसारच प्रवाशांकडून भाडे आकारणी करावी लागेल. ई-बाइक टॅक्सीची भाडे आकारणी दोन टप्प्यांत आधारित आहे. पहिल्या टप्प्यात प्रति 1.5 किलोमीटर अंतरासाठी प्रवाशांना 15 रुपये भाडं द्यावे लागेल तर त्यापुढील प्रवासासाठी प्रति किलोमीटर 10.27 रुपये मोजावे लागतील. भाड्याचे दर प्रत्येक शहरात समान असतील की नाही याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.
advertisement
ई-बाइक टॅक्सी सेवेमुळे प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषणावर पूर्णपणे आळा बसेल आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. शिवाय ई-बाइक टॅक्सीमुळे प्रवाशांना कमी वेळेत इच्छित स्थळी पोहचता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण देखील कमी होईल.
पार्टिशन आवश्यक
ई-बाइक टॅक्सीवरून प्रवास करताना एकावेळी दोन जण म्हणजे चालक आणि त्यामागे एकच प्रवासी असेल. प्रवासी महिला असल्यास त्यासाठी संबंधित वाहनावर पार्टिशन बंधनकारक असणार आहे. त्यामुळे चालकांना पार्टिशनची व्यवस्था करावी लागणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
E-bike Taxi: ई-बाइक टॅक्सीला हिरवा कंदील, किती असेल भाडं? वाचा A टू Z माहिती
Next Article
advertisement
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
View All
सलग दुसऱ्या दिवशी इतक्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, शुक्रवारी 26 सप्टेंबरचे दर
भोपळ्याच्या फुलाचे हे 7 फायदे माहित आहेत? तंदुरुस्त राहण्यासाठी करा आहारात सामील
गंगा घाटच नाही, ऋषिकेशमधील ‘हे’ घाट देखील खास आहेत; एकदा अनुभव नक्की घ्या..
वारं फिरलं, टेन्शन वाढलं! पुणे, सोलापुरात धो धो कोसळणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट
भुईंजच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर सूर्याकिरणांचा अभिषेक, पाहा PHOTOS
आणखी पाहा
ताज्या बातम्या
Hair Care : कोरियन हेअर केअरची जादू, घरी तयार करता येईल हेअर पॅक
E-bike Taxi: ई-बाइक टॅक्सीला हिरवा कंदील, किती असेल भाडं? वाचा A टू Z माहिती
अरे बापरे बाप! काय आहे हे? पोट दुखतंय म्हणून आला, ऑपरेशननंतर डॉक्टरही धक्क्यात
सलग दुसऱ्या दिवशी इतक्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, शुक्रवारी 26 सप्टेंबरचे दर
आणखी पाहा
advertisement