कोण होता जेफ्री एपस्टीन
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याचं नाव अनेक काळ्या कृत्याशी जोडलं गेलं आहे. तो स्वतःला इनव्हेस्टमेंट बँकर म्हणवून घेत होता. त्याचं अमेरिकेतील अनेक हाय प्रोफाईल लोकांमध्ये उठ-बस होती. त्याची अमेरिकेत अनेक ठिकाणी मोठी संपत्ती होती. यात महागड्या रिसॉर्ट आणि हॉटेल्सचा देखील समावेश होता.
तो नव्वदीच्या दशकात अनेक राजनैतिक आणि बड्या व्यवसायिकांच्या सर्कलमध्ये दिसत होता. यात बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू, बिल गेट्स अशा मोठ्या नावांचा देखील समावेश होता. त्यामुळ एपस्टीन हे सतत चर्चेत होते.
मात्र २००७ मध्ये एपस्टीनचं नाव हे एका मोठ्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात समोर आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध आणि मसाजच्या नावावर त्यांचं शोषण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्याला १३ महिन्यांचा तुरूंगवास देखील झाला होता. त्याचं नाव लैंगिक शोषण अपराधी म्हणून नोंदवलं गेलं.
जेलमध्ये केली आत्महत्या
२०१९ मध्ये जेफ्री एपस्टीन याला पुन्हा एकदा अल्पवीय मुलींच्या सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपात अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर केस चालली. दरम्यान, त्यानं जेलमध्येच आत्महत्या केली. जेफ्री एपस्टीनची डोनाल्ड ट्रम्प सोबत मैत्री होती. ट्रम्प यांनीच मी जेफ्री यांना १५ वर्षापासून ओळखतो ते चांगले व्यक्ती आहेत असा खुलासा केला होता.
दरम्यान, हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या सदस्यांनी जेफ्री एपस्टीन यांच्या संदर्भातील दस्तऐवजातील तिसऱ्या टप्प्यातील माहिती उघड केली. त्यात एपस्टीनची दैनंदिनी, फ्लाईट लॉग्स, फोन मॅसेज रेकॉर्ड्स आणि आर्थिक दस्तऐवजांचा समावेश आहे. अशी एकूण ८ हजार ५४४ पानं उघड झाली आहेत.