Fake Death | BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यूचा बनाव, 1.40 कोटींच्या कर्जासाठी कारनामा

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रFake Death | BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यूचा बनाव, 1.40 कोटींच्या कर्जासाठी कारनामा

By : abp majha web team  | 18 Sep 2025 12:06 PM (IST)

मध्य प्रदेशातील BJP नेते महेश Soni यांचा मुलगा विशाल Soni याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून अटक करण्यात आली आहे. विशाल Soni याच्यावर एक कोटी चाळीस लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज चुकवण्यासाठी त्याने पाच सप्टेंबर रोजी आपल्या मृत्यूचा बनाव रचला. त्याने आपली गाडी कालीसिंधी नदीमध्ये ढकलून दिली आणि तो फरार झाला. महाराष्ट्रातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे तो देवदर्शन करत होता. तिकडे मध्य प्रदेश पोलीस कालीसिंधी नदीत त्याचा मृतदेह शोधत होते. पोलिसांना त्याची कार सापडली, परंतु विशाल Soni सापडला नाही. दहा दिवस नदीच्या वीस किलोमीटर भागात शोधकार्य सुरू होते. आठ दिवसांनंतर पोलिसांना या प्रकरणात काहीतरी संशयास्पद वाटले. त्यांनी विशाल Soni च्या फोनचे कॉल रेकॉर्ड तपासले असता तो महाराष्ट्रात असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. आपण जिवंत असल्याचे पोलिसांना कळले हे समजल्यावर विशालने स्वतःचे कपडे फाडले, अंगावर धूळ लावली आणि फर्दापूर पोलीस ठाण्यात जाऊन आपले अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्य प्रदेश पोलिसांनी संपर्क साधत त्याला अटक केली. पोलिसांनी चौकशी केली असता, आपण कर्जबाजारी झाल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. त्याने सहा ट्रक आणि दोन प्रवासी वाहतूक करणारी वाहने खरेदी केली होती, परंतु त्याचे हप्ते तो चुकवू शकत नव्हता. “मरण पावल्याचं घोषित झालं तर सगळं कर्ज माफ होईल असा सल्ला कुटुंबियांनीच दिला होता,” असेही विशालने पोलिसांना सांगितले.

महाराष्ट्र

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment