Farmers’ Protest: Parbhani मध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा Diwali नंतर मंत्र्यांना फिरू देणार नाही

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रFarmers’ Protest: Parbhani मध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा Diwali नंतर मंत्र्यांना फिरू देणार नाही

By : abp majha web team  | 26 Sep 2025 08:38 PM (IST)

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. प्रशासनाने दिवाळीपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. एका आंदोलकाने इशारा दिला की, “दिवाळीपर्यंत जर अंमलबजावणी नाही केली तर आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रस्तारोको करून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना आणि मंत्र्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही.” या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, ‘कोहीनूर’ ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment