एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रGanesh Visarjan | मुंबईत ७ दिवसांच्या बाप्पाला निरोप, High Court च्या आदेशानुसार विसर्जन
By : abp majha web team | 03 Sep 2025 12:14 AM (IST)
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये सात दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. अनेक घरांमधील गौरी गणपतीचंही आज विसर्जन झालं. मुंबईत विसर्जनासाठी विविध समुद्रकिनारे आणि कृत्रिम तलावांवर जय्यत तयारी करण्यात आली होती. जुहू चौपाटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरेगाव पश्चिम बागूरनगर परिसरात गणेश घाट तलावात विसर्जन शांततेत पार पडलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सहा फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यात आलं, तर सहा फुटांपेक्षा लहान गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आलं. या नियमांचं पालन करत भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.
महाराष्ट्र
Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा