एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रGauri Ganpati Visarjan | राज्यभरात सात दिवसांच्या बाप्पांना निरोप, कोकणात पारंपरिक सोहळा
By : abp majha web team | 02 Sep 2025 11:18 PM (IST)
राज्यभरात गौरी गणपतींसह सात दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. भक्तिमय वातावरणात भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत निरोप दिला. कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने गौरी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. ढोलताशांचा गजर आणि गुलाबाची उधळण करत कोकणवासियांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीचे दोन दृश्य समोर आले. या दृश्यांमध्ये अभिषेक थाटून स्मृतींप्रती वंदना करण्यात आली. अनेक ठिकाणी भाविकांनी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र
Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा