मुंबई: मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली. ही सुनावणी कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पार पाडली. कोर्टाने जे काही सुरू आहे, ते बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. कोर्टाने दुपारी 3 वाजेपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आम्हाला मुंबई शहर पूर्वपदावर हवं असल्याचे हायकोर्टाने बजावले. आता पुढील दीड-दोन तासात काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
advertisement
मराठा आंदोलनकर्त्यांकडून काल रात्री आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पोलीस परवानगीसाठी अर्ज केला होता. आज सकाळी मुंबई पोलिसांनी हा अर्ज फेटाळला आणि परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे यांना पोलिसांनी नोटीसही बजावली. तर मराठा आंदोलनकर्त्यांच्यावतीने अॅडव्होकेट सतीश मानेशिंदे यांनी आज युक्तिवाद केला.
advertisement
आजच्या सुनावणीत खंडपीठाने म्हटले की, फक्त ५ हजार लोकांना आझाद मैदानावर परवानगी ..मग उर्वरित लोकांना तुम्ही सुचीत करायला हवं . ५० हजार ते १ लाख लोक मुंबईतील रस्त्यांवर आले आहेत.. प्रसार माध्यमांच्या मदतीने ज्यादा लोकांनी परत जावे असे आम्ही सुचीत केले. वाहनांची वाहन मालकांची माहीत तुम्हाला द्यावी लागेल असे म्हटले. त्यावर ॲड सतीश मानेशिंदे यांनी म्हटले की, काही लोकांकडून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो, असे सांगितले. हायकोर्टाने आझाद मैदान रिकामं करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये संघर्ष होण्याची भीती आहे.
advertisement
advertisement
आझाद मैदान हे 3 वाजेपर्यंत रिकामं करा आणि 3 वाजता होणार्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने अॅड. सतीश मानशिंदे यांना दिले. राज्य सरकारने परवानगी नाकारली तरी जर मैदानावर आंदोलन सुरू असेल तर हे पहिल्यांदा हटवा अशी सक्त सूचनाही खंडपीठाने दिली. गरज भासल्यास आम्ही स्वत: त्या ठिकाणी येऊन परिस्थितीचा आढावा घेऊ असे हायकोर्टाने म्हटले.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
High Court On Maratha Morcha : मुंबई पोलिसांचे काउंटडाऊन सुरू, दीड तासात काय होणार? मराठा आंदोलनावर हायकोर्टाची कठोर भूमिका