IND A vs AUS A 2025 | तापाने फणफणलेल्या राहुलचा झंझावात!

के. एल. राहुलला यापूर्वी गुरुवारी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी दुखापतीमुळे 74 धावांवर निवृत्त व्हावे लागले होते. मात्र, शुक्रवारी चौथ्या व शेवटच्या दिवशी नाईट वॉचमन मानव सुतार बाद झाल्यानंतर के. एल. राहुल मैदानात परतला आणि त्याने नाबाद राहत विजयावर शिक्कामोर्तब क रत आपल्या दुर्दम्य जिद्दीची प्रचिती दिली. आपण मैदानात परतलो, ते विजयाच्या निर्धारानेच, हेच जणू त्याने अधोरेखित करून दाखवले.
 

Author

Leave a Comment