Jog Recruitment | राज्यात 10,000 जागांची विक्रमी भरती, 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्ती

मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रJog Recruitment | राज्यात 10,000 जागांची विक्रमी भरती, 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्ती

By : abp majha web team  | 05 Sep 2025 10:22 AM (IST)

राज्यात अनुकंपा तत्वावर जवळपास दहा हजार जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पंधरा सप्टेंबरपर्यंत नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा भरल्या जातील. कायदेशीर बाबी आणि किचकट नियमांमुळे ही भरती प्रक्रिया रखडलेली होती. आता राज्य सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी दिली जाते, याला अनुकंपा तत्वावरील नोकरी म्हणतात. “खरं तर एकत्रितपणे अनुकंपा तत्वावरील एवढी मोठी भरती पहिल्यांदाच पाहायला मिळते.” राज्यभरात रिक्त असलेल्या नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा सप्टेंबरपर्यंत या सर्व जागा भरल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे ज्या तरुणांचे वडील मृत कर्मचारी होते, त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे.

महाराष्ट्र

Ajit Pawar Threat Women Officer : अॅक्शन घेईन,कायद्याने वागणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अजितदादांची धमकी

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा

टेलिग्राम जॉईन करा

 

Author

Leave a Comment