एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रKDMC Illegal Buildings : डोंबिवलीतील समर्थ अपार्टमेंटवरील कारवाईविरोधात गोंधळ, KDMCकडून स्थगिती
By : abp majha web team | 09 Sep 2025 07:38 AM (IST)
कल्याण डोंबिवलीतील पासष्ठ बेकायदा इमारतींपैकी एक असलेल्या समर्थ Apartment वरील महापालिकेच्या तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. तोडक कारवाईबाबत गोंधळ असल्याची बातमी ABP ने दाखवली होती, त्याची दखल घेत ही स्थगिती दिल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक पोलीस आयुक्त Suhas Hemade यांनी दिली. कारवाईपूर्वी इमारत रिकामी करण्यासाठी गेलेल्या महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना रहिवाशांनी धारेवर धरले. घरांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरूनही बेघर होण्याची भीती असलेल्या रहिवाशांनी “आमची घरं पाडली तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल विचारत आत्महत्येची धमकी दिली. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही नागरिकांनी केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनेवरून ठाकरेंच्या Shiv Sena चे जिल्हाप्रमुख Dipesh Mhatre यांनी KDMC प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. Court ने Jai Malhar इमारतीवरील कारवाईचे आदेश दिले असतानाही त्यावर कारवाई न करता समर्थ Apartment वर कारवाई केली जात असल्याचा आरोप Mhatre यांनी केला.
महाराष्ट्र
Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा