एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रKhedkar family missing | पूजा खेडकरचं कुटुंब बेपत्ता, पोलिसांचा कसून शोध सुरू
By : abp majha web team | 18 Sep 2025 12:10 PM (IST)
पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांचा अद्यापही पत्ता लागलेला नाहीये. नवी मुंबईतून एका ट्रक ड्रायव्हरचं अपहरण केल्याच्या प्रकरणात दिलीप खेडकर आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत. दिलीप खेडकरला पलायन करण्यास मदत करणं आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस खेडकर कुटुंबियांचा कसून शोध घेत आहेत. सगळ्या कुटुंबियांचे फोन गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत. तसेच या चार दिवसात त्यांनी एकही ऑनलाइन व्यवहार केला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सर्व घडामोडींमुळे पोलिसांना त्यांचा शोध अद्यापही का लागलेला नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत असून, या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. खेडकर कुटुंब नेमके कुठे गेले, याबाबत गूढ कायम आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा