kolhapur | लाडक्या बाप्पाला आज निरोप

गणेश विसर्जन मिरवणूक संस्मरणीय ठरावी, याकरिता प्रत्येक मंडळाने नियोजन केले आहे. विविध देखावे, नृत्य पथके, पारंपरिक वाद्ये, चित्ररथ, आकर्षक रोषणाई आदींनी मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-पापाची तिकटी-गंगावेसमार्गे इराणी खण या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गासह बिंदू चौक-शिवाजी चौक ते पापाची तिकटी, बिंदू चौक ते देवल क्लब या दोन समांतर मार्गांसह हॉकी स्टेडियम-संभाजीनगर-देवकर पाणंदमार्गे इराणी खण अशा पर्यायी मार्गाने मिरवणूक निघणार आहे. पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही, याकरिता गंगावेसमधून पंचगंगा नदीकडे मंडळांना सोडले जाणार नाही.
 

Author

Leave a Comment