एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रLaxman Hake | पवारांच्या बालेकिल्ल्यात हाकेंचा एल्गार, मराठा आरक्षणावर सडकून टीका Special Report
By : abp majha web team | 05 Sep 2025 10:02 PM (IST)
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा घेऊन बारामतीमध्ये धडक दिली. गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही हाके आणि आंदोलक थांबले नाहीत. जरांगे यांच्या आंदोलनाचे उदाहरण देत त्यांनी बारामती गाठली. वाटेत नीरा गावामध्ये मराठा समाजाकडून त्यांचे स्वागत झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणासाठी काढलेल्या नव्या जीआरमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढली आहे. नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण केले, तर छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त केली. हाकेंनी थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मोर्चा काढला. बारामती तालुक्यातील पंढरे गावातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जोतिबा फुले चौक या पाटीचे अनावरण केले. एका वक्त्याने म्हटले की, “शरद पवार आणि मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मांडगुटीवर बसवलं.” बारामतीतील लोकांनी जरांगेच्या आंदोलनाला रसद पुरवल्याचा हाकेंचा मुख्य आक्षेप होता. हर्षवर्धन पाटील यांनी या आरोपांचे खंडण केले. मोर्चाच्या सांगतेच्या भाषणात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सरकारवर टीका करण्यात आली. बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवरून सभेला संबोधित करत सरकारचा नवा जीआर आणि मराठा आरक्षणातील खाचाखोचा समजावून सांगितल्या. मराठ्यांना कोणतीही जाती त्यांनी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार सरकारकडे देण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात लढावे लागणार असल्याचे मत व्यक्त केले. ओबीसींमधील अस्वस्थता सरकार दरबारी पोहोचविण्याचे काम तीन पातळ्यांवर सुरू आहे. हा विषय इथेच संपण्याची शक्यता कमी आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा