Local Body Elections | कोण कुणाचा ‘घट’ उठविणार, सत्तेचा ‘घट’ कोण बसविणार?

हसन मुश्रीफ यांनी टोचले कान
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी 81 पैकी 80 जागांवर दावा केला आहे. मात्र महायुतीत तिसरा मित्र पक्ष आहे हे ते विसरले आहेत. 20 वर्षे आम्ही महापालिकेच्या सत्तेत आहोत, असे स्पष्ट करीत राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूर शहराच्या आमदारांनी सबुरीने घ्यावे. आम्हाला दुर्लक्षित करू नका. महापालिकेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही, अशा शब्दांत धनंजय महाडिक व राजेश क्षीरसागर यांच्या वक्तव्याची दखल घेतली.
या सर्व आरोप-प्रत्यारोपामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोण कुणाचा घट उठविणार हाच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
 

Author

Leave a Comment