सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिका भाजप शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रित लढणार आहेत. विशेष म्हणजे एकत्र लढताना स्थानिक कार्यकर्ते दुखावले जाऊ नयेत, याची काळजी महायुतीमधील सर्व घटक पक्ष घेणार आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा महायुतीमधील पक्षाचा संघर्ष होऊ शकतो. सर्व ठिकाणी युती करण्याची भूमिका घेतल्यास कार्यकर्त्यांना लढण्यासाठी जागा मिळणार नाही त्यामुळे गेले काही वर्षे मेहनत केलेले आणि तयारी केलेले कार्यकर्ते ऐन वेळेवर विरोधी पक्षांमध्ये जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे महायुतीमधील नेते सावध भूमिका घेत आहेत.