एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रMaharashtra Doctors Strike | होमिओपॅथी डॉक्टरांचा महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला विरोध, आक्रमक पवित्रा
By : abp majha web team | 18 Sep 2025 12:14 PM (IST)
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि संलग्न वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीएमएस (BMS) डॉक्टर्सना सीसीएमपी (CCMP) कोर्सेस करून अॅलोपॅथी (Allopathy) ची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात हा विरोध आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत, म्हणजेच चोवीस तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमधील ओपीडी (OPD), शस्त्रक्रिया (Surgery) आणि इतर रुग्ण तपासणी सेवा बंद राहतील. मात्र, आकस्मिक सेवा (Emergency Services) यातून वगळण्यात आल्या आहेत. या बंदमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागेल. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर मुंबई (Mumbai) येथे लॉग मार्च (Long March) काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जेजे रुग्णालयामध्ये (JJ Hospital) डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांनी काळ्या फिती (Black Ribbons) बांधून निषेध व्यक्त केला. “एक पॅथीमधे एक डॉक्टर रजिस्टर असताना सुद्धा त्याला दुस-या पॅथीमधे का रजिस्टर करावं?” असा प्रश्न डॉक्टरांनी उपस्थित केला. हा निर्णय सखोल अभ्यास न करता घेतला असून, यामागे रुग्णांची काळजी आहे की राजकीय कारण, हे तपासणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा