Maharashtra Police Recruitment 2025: महाराष्ट्र पोलिस दलात लवकरच मोठी भरती होणार आहे. शिपाई संवर्गातील १५ हजारहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. गृह विभागाने भरती प्रक्रियेचे आदेश जारी केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात नवीन कर्मचारी दाखल होणार आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलातही १७२ जागा भरण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.